आर्या आंबेकर आणि मामेखान यांची मैफिल सजणार, रसिक श्रोत्यांसाठी पर्वणी

आर्या आंबेकर आणि मामेखान यांची मैफिल सजणार, रसिक श्रोत्यांसाठी पर्वणी

मराठमोळी गोड गळ्याची गायिका आर्या आंबेकर हिची गाणी ऐकण्याची एक सुरेल पर्वणी लवकरच रसिकांना मिळणार आहे. आर्यासोबत कोक स्टुडिओफेम मामे खान तसंच, प्रसिद्ध सतार वादक पुरबियान चॅटर्जी यांची एक सुश्राव्य मैफिल महाराष्ट्राच्या रसिकांसाठी आयोजित करण्यात आली आहे.

हर्षद पराशरे यांच्या पॅराशेअर एन्टरटेन्मेंट्स या कंपनीने या तीन कार्यक्रमांच्या सांगितिक मेजवानीची घोषणा केली आहे. या कार्यक्रमांत यापूर्वी न गायलेली गाणी आर्या आंबेकर गाणार आहे. तसंच, कोक स्टुडिओमधून प्रसिद्ध झालेल्या मामे खान यांच्याही राजस्थानी ढंगाची गायकी सादर होणार असून त्याला पुरबियान चॅटर्जींच्या सतार वादनाची साथ लाभणार आहे.

आर्या, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची ही मैफिल 5 मे रोजी मुंबईत मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात तर 22 मे रोजी बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे रंगमंदिर येथे होणार आहे.  मराठी आवाज, राजस्थानी ठेका आणि बंगालचा गोडवा याचा मिलाफ या मैफिलीतून श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. तर मामे खान आणि पुरबियान चॅटर्जी यांची जुगलबंदी 11 मे रोजी रॉयल ऑपेरा हाऊस येथे सादर होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;