दोन ट्रकची आमने सामने धडक, 2 जण ठार तर 300 बकऱ्यांचा मृत्यू

दोन ट्रकची आमने सामने धडक, 2 जण ठार तर 300 बकऱ्यांचा मृत्यू

यवतमाळ ते पांढरकवडा मार्गावरील सायखेड धरण फाट्याजवळ परस्पर विरूद्ध दिशेने धावणाऱ्या दोन ट्रकची टक्कर झाली. या भीषण अपघातात ट्रकमधील दोनजण जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झालेत. या अपघातात ट्रकमधील 300 बकऱ्यासुध्दा ठार झाल्यात. जिकडेतिकडे मृत बकऱ्यांचा खच पडला होता.

चंद्रपूर येथून सिमेंट भरून यवतमाळकडे निघालेल्या ट्रक आणि मध्यप्रदेशातून तेलंगणात बकऱ्या भरून निघालेला ट्रक, या दोन ट्रकमध्ये आमनेसामने धडक झाली. अपघातात ट्रकमधील दोन जणांचा मृत्यू झाला तर ट्रकमधी सुमारे 300 बकऱ्या मृत्युमुखी पडल्या. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले.

हा अपघात इतका भीषण होता की ट्रकचा अक्षरशः चुराडा झाला. जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. जखमींना तातडीने दवाखान्यात उपचारार्थ रवाना करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर पांढरकवडा पोलिसांनी दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;