कार आणि दुचाकीच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

कार आणि दुचाकीच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

पाथर्डी नगर रोडवर असलेल्या मानमोडी पुलाजवळ झालेल्या अपघातात सख्या चुलत भावांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघाताची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत संदीप एकनाथ बडे (वय 24) व गणेश भानुदास बडे (वय 16) (रा.येळी ता. पाथर्डी ) यांचा मृत्यू झाला आहे. संदीप बडे व गणेश बडे हे येळी गावची यात्रा करून पाथर्डीतून नगरला जात होते. यावेळी मानमोडी पुला जवळ समोरून येणाऱ्या स्विप्ट कारने या दोघांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दोघेही जखमी झाले. दोन्हीही जखमींना तातडीने पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र दोघांचीही प्रकुर्ती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगरला हलवण्यात आले. उपचारा दरम्यान अगोदर सोमवारीच संदीप एकनाथ बडे याचा मृत्य़ू झाला. तर गणेश बडे याचा दुसऱ्या दिवशी मंगळवारी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेने येळी परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;