सिद्धू मूसेवालाच्या आईला सरोगसीने नको होतं दुसरं बाळ; वडील म्हणाले “माझ्या निधनानंतर त्याला..”
पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या निधनानंतर त्याचे आईवडील खूप खचले होते. पंजाबमधील मनसा जिल्ह्यात सिद्धूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता त्याच्या मृत्यूच्या दोन वर्षांनंतर मूसेवालांच्या कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.
सिद्धूची आई चरण कौर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी आयव्हीएफच्या मदतीने मुलाला जन्म दिला. या दुसऱ्या मुलाचंही नाव त्यांनी शुभदीप असंच ठेवलं आहे. सिद्धूचंही खरं नाव शुभदीप असं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मूसेवालाच्या वडिलांनी पत्नीच्या दुसऱ्या प्रेग्नंसीबाबत मौन सोडलं.
"मला याची जाणीव आहे की जेव्हा आमचा मुलगा शुभ मोठा होईल, तेव्हा कदाचित मी त्याच्यासोबत नसेन. मी माझ्या हृदयाचं स्वास्थ्य राखण्यासाठी रोज अनेक औषधं खातो. किमान जेव्हा माझे अखेरचे क्षण येतील, तेव्हा माझ्या बाजूने कोणी तरी उभं असेल", असं ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List