जेठालालचे पात्र साकारत दिलीप जोशीने मिळवली प्रसिद्धी आणि पैसा, ‘या’ अभिनेत्यांनी नाकारली भूमिका हे..

जेठालालचे पात्र साकारत दिलीप जोशीने मिळवली प्रसिद्धी आणि पैसा, ‘या’ अभिनेत्यांनी नाकारली भूमिका हे..

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. तारक मेहता मालिकेत भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. या मालिकेने नक्कीच मोठा काळ गाजवला आहे. घरातील जवळपास सर्वच सदस्यांना ही मालिका बघायला आवडते. तारक मेहता मालिकेत मुंबईतील एक सोसायटी दाखवण्यात आलीये. यामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात आणि ते कसे मिळून राहतात ही मालिकेची कशा आहे.

तारक मेहता मालिकेतील सर्वात महत्वाचे आणि लोकांच्या आवडीचे पात्र म्हणजे जेठालाल आहे. जेठालालची भूमिका गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेते दिलीप जोशी हे साकारत आहेत. जेठालालच्या पात्रावर प्रेक्षक प्रचंड प्रेम करतात. मालिकेच्या सुरूवातीपासूनच दिपील जोशी हे पात्र साकरत आहेत. दिलीप जोशीची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग आहे.

दिलीप जोशी यांना लोक जास्त करून जेठालाल याच नावाने ओळखतात. दिलीप जोशी हे आज कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. मात्र, दिलीप जोशी हे जेठालालच्या भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली पसंत नव्हते. अनेक अभिनेत्यांनी वेगवेगळी कारणे देत जेठालालचे पात्र साकारण्यास नकार दिला. शेवटी दिलीप जोशीने यासाठी होकार दिला.

दिलीप जोशी हे जेठालालच्या पात्रामुळे रातोरात स्टार बनले. रिपोर्टनुसार निर्मात्यांनी सर्वात अगोदर जेठालालच्या पात्रासाठी अभिनेता अली असगर याला अप्रोच केले होते. मात्र, हातामधील काम सोडून येऊ शकत नसल्याने अभिनेत्याने या पात्रासाठी नकार दिला होता. योगेश त्रिपाठीला देखील जेठालालच्या पात्रासाठी ऑफर देण्यात आली होती.

योगेश त्रिपाठीने देखील जेठालालच्या पात्रासाठी नकार दिला. कीकू शारदाला देखील जेठालालच्या पात्राची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी कीकू शारदा डेली शोचा हिस्सा असल्याने जेठालालच्या पात्रासाठी नकार दिला. तारक मेहता मालिकेतील अनेक कलाकार हे मालिका सोडून जाताना दिसत आहेत. आता काही नवीन कलाकार हे मालिकेत दाखल झाले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;