सिद्धू मूसेवालाच्या आईला अचानक ब्लीडिंग..; 58 व्या वर्षी गरोदरपणात आल्या होत्या समस्या

सिद्धू मूसेवालाच्या आईला अचानक ब्लीडिंग..; 58 व्या वर्षी गरोदरपणात आल्या होत्या समस्या

दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या आईने वयाच्या 58 व्या वर्षी मार्च महिन्यात दुसऱ्या बाळाला जन्म दिला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धूचे वडील बलकौर सिंग यांनी पत्नीच्या गरोदरपणात आलेल्या समस्यांविषयी सांगितलं. सिद्धूच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर त्याच्या आईवडिलांनी पुन्हा एकदा पालक होण्याचा निर्णय घेतला. IVF म्हणजेच विट्रो फर्टिलायजेशनच्या मदतीने चरणकौर या आई बनू शकल्या. 17 मार्च रोजी चरण कौर आणि बलकौर सिंग यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. मात्र वयाच्या 58 व्या वर्षी हे गरोदरपण सोपं नव्हतं. चरण कौर यांना दररोज विविध इंजेक्शन्स घ्यावे लागायचे, असं सिद्धूच्या वडिलांनी सांगितलं.

पत्नीच्या गरोदरपणातील घटनेबद्दल सांगताना ते पुढे म्हणाले, “एके रात्री अचानक मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला होता. त्यावेळी भटिंडामधील खासगी रुग्णालयात नेईपर्यंत माझा जीव टांगणीला लागला होता. जर त्यादिवशी तिला काही झालं असलं तर मी माझं सर्वस्व गमावलं असतं. मला हे मान्य करावं लागेल की ज्याप्रकारे माझ्या पहिल्या मुलाला त्याचं बालपण मोकळेपणे जगता आलं, तसं माझ्या या दुसऱ्या मुलाला मोकळेपणे राहता येणार नाही. कारण तो सतत लोकांच्या नजरेत असेल. तो मुक्तपणे इथे-तिथे फिरु शकणार नाही, सर्वसामान्यांप्रमाणे व्हॅनमध्ये शाळेत जाऊ शकणार नाही.”

सिद्धू मूसेवालाची 29 मे 2022 रोजी मनसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरून त्याने मनसा मतदारसंघात पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. राज्य सरकारने सिद्धू मूसेवालाची सुरक्षाव्यवस्था काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर गोळीबार झाला होता. सिद्धूच्या हत्येप्रकरणी 31 जणांवर आरोप करण्यात आले होते. ज्यामध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचाही समावेश होता. तर आतापर्यंत याप्रकरणात 25 जणांना अटक करण्यात आली आहे.सिद्धू मूसेवाला हा पंजाबमधील अत्यंत प्रसिद्ध गायक आणि रॅपर होता. तो स्वत:च त्याची गाणी लिहायचा आणि त्यांची निर्मिती करायचा. तो सर्वांत श्रीमंत पंजाबी गायकांपैकी एक होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;