बलात्काऱ्याला देशाबाहेर पळू देणं हीच मोदींची गॅरंटी, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

बलात्काऱ्याला देशाबाहेर पळू देणं हीच मोदींची गॅरंटी, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

पंतप्रधान एका सराईत बलात्काऱ्यासाठी मत मागतात. जाहीर व्यासपीठावरून त्याचं समर्थन करतात. अशा बलात्काऱ्याला देशाबाहेर पळू देणं हीच मोदींची गॅरंटी आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. कर्नाटकच्या शिवमोगा येथे झालेल्या सभेवेळी ते बोलत होते.

नरेंद्र मोदी यांनी 22 अब्जाधीश बनवले आहेत. पंतप्रधानांना याच अब्जाधीश मित्रांकडून पैसे मिळणार आहेत, ते फक्त अब्जाधीशांची कर्ज माफ करतात, त्यांनी देशातील तरुणांना बेरोजगारी आणि गरिबी दिली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांवर बलात्कार करून त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवले आणि नरेंद्र मोदी यांनी जाहीर व्यासपीठावरून त्याचं समर्थन केलं. जर तुम्ही याला मत द्याल तर माझी मदत होईल, असं मोदी या बलात्काऱ्याला उद्देशून म्हणाले. हे विधान करून मोदींनी देशातील सर्व महिलांचा अवमान केला आहे. त्यांनी मान खाली घालून आणि हात जोडून या महिलांची क्षमा मागितली पाहिजे, असा जोरदार हल्लाबोल राहुल गांधी यांनी यावेळी केला.

अशा सराईत बलात्काऱ्याला देशाबाहेर पळू दिलं. ज्याने शेकडो बलात्कार केले तो जर्मनीला पळून गेला. अशा बलात्काऱ्यांना देशाबाहेर पळू देणं हीच मोदींची गॅरंटी आहे. अशांना वाचवणं हेच भाजपचं काम आहे, अशी जोरदार टीकाही राहुल गांधी यांनी यावेळी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;