UAE ला वादळी पावसानं झोडपलं; उड्डाणं रद्द

UAE ला वादळी पावसानं झोडपलं; उड्डाणं रद्द

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) एप्रिल महिन्यात मोठा पूर आल्याच्या काही दिवसांनंतर पुन्हा एकदा इथे पावसाने तडाखा दिला आहे. गुरुवारी पहाटे मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळ झाल्यानंतर अबू धाबी आणि दुबईला चांगलाच फटका बसला आहे. या वादळी पावसामुळे उड्डाण रद्द झाले आणि दुबईमध्ये बस सेवा निलंबित करण्यात आली.

खलीज टाइम्सच्या म्हणण्यानुसार, दुबईला जाणारी पाच इनबाउंड फ्लाइट्स रात्रभर वळवण्यात आली, तर नऊ आगमन आणि चार आउटबाउंड फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या. एमिरेट्सच्या अनेक उड्डाणेही रद्द करण्यात आल्याचे अहवालात म्हटलं आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दुबईतील रहिवासी गुरुवारी पहाटे 3 वाजता जोरदार वारा, गडगडाट आणि विजेच्या कडकडाटाने जागे झाले.

सुमारे एक तासानंतर, पहाटे 4 वाजता, देशाच्या हवामान खात्यानं अॅलर्ट जारी केला ज्याद्वारे सूचित करण्यात आलं की देशाच्या बहुतेक भागांना ढगांनी व्यापले आहे. 3 मे पर्यंत देशभरात प्रतिकूल हवामान राहण्याची अपेक्षा होती.

तसेच रहिवाशांना पावसाळ्यात सुरक्षिततेच्या उपायांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

अबू धाबीच्या काही भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याचे वृत्त आहे, तर जेबेल अली, अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ, दुबई इंडस्ट्रियल सिटी, दुबई इन्व्हेस्टमेंट पार्क आणि जुमेराह व्हिलेज ट्रँगलमध्ये जोरदार वारे वाहत असल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;