मी कट्टर हिंदू..; गोविंदाच्या भाचीची पोस्ट चर्चेत, धर्म बदलण्याबद्दल मागितली माफी

मी कट्टर हिंदू..; गोविंदाच्या भाचीची पोस्ट चर्चेत, धर्म बदलण्याबद्दल मागितली माफी

अभिनेता गोविंदाची भाची रागिनी खन्ना ही तिची बहीण आरती सिंहच्या लग्नापासून जोरदार चर्चेत आहे. नुकतीच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट लिहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रागिनीच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत आहे. तिने एक दिवस आधी लिहिलेल्या पोस्टमध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारत असल्याचं सांगत सर्वांना चकीत केलं. रागिनीने घेतलेला हा अचानक निर्णय पाहून नेटकरीसुद्धा पेचात पडले. इन्स्टाग्रामवर धर्म परिवर्तनाची पोस्ट शेअर करत तिने म्हटलं होतं की आता ती यापुढे ख्रिश्चन धर्माचं पालन करणार आहे. मात्र या पोस्टला 24 तास पूर्ण होण्याआदीच तिने ती डिलिट करत नेटकऱ्यांची माफी मागितली. मी माझ्या धर्म परिवर्तनच्या पोस्टसाठी माफी मागते असं लिहित एका हिंदू धर्मगुरूंच्या भाषणाचा व्हिडीओ तिने स्वत:च्या फोटोसोबत शेअर केला आहे.

गोविंदाची भाची रागिनी ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सुरुवातीला तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं म्हटलं होतं. नंतर ती पोस्ट डिलिट करत तिने नेटकऱ्यांची माफी मागितली आणि नवीन पोस्ट लिहिली. या नव्या पोस्टमध्ये तिने लिहिलं, ‘हाय, मी रागिनी खन्ना आहे. मी माझ्या मागील व्हिडीओसाठी माफी मागते. ज्यामध्ये ती ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं म्हटलं होतं. मी पुन्हा एकदा माझ्या मूळ धर्माकडे परतली आहे. इतकंच नाही तर आता मी एक कट्टर हिंदू बनली आहे. मी सनातनी मार्ग स्वीकारला आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by watchman (@chukidarbhadur2.0)

रागिनीच्या या नव्या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत प्रसिद्ध हिंदी कथावाचक दिसत आहेत. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर रागिनीचा अकाऊंट कोणी हॅक केला का, असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे. रागिनीचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करून चौकीदार बहादूर नावाचा एक व्यक्ती तो अकाऊंट चालवत असल्याचं म्हटलं जातंय. मात्र याविषयी अद्याप रागिनीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. रागिनीने स्वत: ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याबाबत पोस्ट लिहिली होती आणि नंतर तिने डिलिट केली, यावर नेटकऱ्यांनी अविश्वास व्यक्त केला आहे. तिचं अकाऊंट कोणीतरी हॅक केलं असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by watchman (@chukidarbhadur2.0)

रागिनीने आतापर्यंत ‘देख इंडिया देख’, ‘भास्कर भारती’, ‘ससुराल गेंदा फूल’, ‘गुड मॉर्निंग विद रागिनी खन्ना’ यांसारख्या मालिका आणि शोजमध्ये काम केलंय. तिने काही चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;