‘या’ सेलिब्रिटींनी केले लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेवर कोट्यवधी खर्च, एका पत्रिकेची किंमत तब्बल इतके लाख, ऐश्वर्या रायपासून ते दीपिकापर्यंत..

‘या’ सेलिब्रिटींनी केले लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेवर कोट्यवधी खर्च, एका पत्रिकेची किंमत तब्बल इतके लाख, ऐश्वर्या रायपासून ते दीपिकापर्यंत..

लग्न म्हटले की, जोरदार खर्च आलाच. त्यामध्येही बाॅलिवूड कलाकारांचे लग्न म्हटले की, कोट्यवधी रूपये खर्च होतात. असे काही बाॅलिवूड स्टार आहेत, ज्यांनी लग्नाच्या पत्रिकेसाठी कोट्यवधी खर्च केले. विशेष म्हणजे अंबानी कुटुंबाच्या लग्नाच्या पत्रिकेची किंमत ऐकली तर तुम्हाला मोठा धक्काच बसेल. चला तर मग जाणून घेऊया की, सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नपत्रिकेसाठी किती पैसे खर्च केले. विशेष म्हणजे यामध्ये रणवीर सिंह ते शाहिद कपूरपर्यंतच्या कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. फक्त लग्नपत्रिकेसाठी यांनी कोट्यवधी रूपये खर्च केले.

मुकेश अंबानी यांची लाडकी लेक ईशा अंबानीचे लग्न आनंद पीरामल याच्यासोबत झाले. आनंद हा प्रसिद्ध उद्योगपती आहे. तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, ईशा आणि आनंदच्या लग्नात 700 कोटी खर्च लग्नाच्या पत्रिकेंसाठी करण्यात आला. त्यांच्या लग्नाच्या एका पत्रिकेची किंमत ही तब्बल 3 लाख रुपये होती. हा विवाहसोहळा देखील अत्यंत शाही पद्धतीने पार पडला.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बचचन यांचे लग्न 2007 मध्ये पार पडले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अमिताभ बच्चन यांनी लेकाच्या लग्नात कोट्यवधी रूपये खर्च केले. रिपोर्टनुसार ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाच्या पत्रिकेसाठी तब्बल 41 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. अत्यंत खास अशी लग्नपत्रिका तयार करण्यात आली होती.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचे लग्न देखील अत्यंत खास पद्धतीने पार पडले. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाला तब्बल 95 कोटी रुपये खर्च आला. यामध्ये त्यांनी लग्नाच्या पत्रिकेंवर कोट्यवधी रूपये खर्च केल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. दीपिका पादुकोण हिचे मंगळसूत्र हे 20 कोटींचे होते. हे मंगळसूत्र हिऱ्यांपासून तयार करण्यात आले.

सैफ अली खानची बहीण सोहा अली खानने अभिनेता कुणाल खेमूसोबत लग्न केले. रिपोर्टनुसार यांच्या लग्नाच्या पत्रिकेवर तब्बल 27 कोटी रुपये खर्च करण्यात आले. लग्नपत्रिकेसोबत यांनी इतरही काही भेटवस्तू पाहुण्यांना पाठवल्या होत्या. ही अत्यंत खास अशी लग्न पत्रिका होती. बरीच दिवस या लग्नपत्रिकेची चर्चा देखील रंगली होती.

अभिनेता शाहिद कपूर याने मीरा राजपूत हिच्यासोबत लग्न केले. यांच्या लग्नामध्येही कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नपत्रिकेसाठी 37 कोटी रुपये खर्च करण्यात आले. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाहसोहळा अत्यंत खास पद्धतीने पार पडला. या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;