स्वातंत्र्य चळवळीशी संबंध नसणाऱ्यांच्या हाती देशाची सत्ता; सांगलीतून शरद पवारांचा घणाघात
देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. एक वेगळी विचारधारा देशात निर्माण झाली आहे. ज्यांचा स्वातंत्र्य चळवळशी संबंध नव्हता त्यांच्या हातात देशाची सत्ता आहेत. त्यांचे नाव नरेंद्र मोदी आहे’; असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते.
सांगली लोकसभेत चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा पार पडली. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, रोहित आर.आर. पाटील, सुमनताई पाटील आदी नेते उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या पैकीच्या पैकी जागा निवडून येतील!
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांविषयी लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आणि महाविकास आघाडीमध्ये एकजुटता आहे. आघाडी एकसंघपणे लढली तर चित्र पलटू शकते आणि महाविकास आघाडीच्या पैकीच्यापैकी जागा निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आज सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव येथे जाहीर सभेला जयंत पाटील संबोधित करत होते.
सांगलीत भाजपचे दोन उमेदवार, एक काका आणि दुसरे दादा; संजय राऊत यांची फटकेबाजी
पुढे बोलताना ते म्हणाले की, तासगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार सुमनताई पाटील या सातत्याने येथील पाण्याचा प्रश्न मांडत आहेत. मी जलसंपदा मंत्री असताना टेंभू योजनेतून या भागात आठ टीएमसी अतिरिक्त पाणी देण्याचा निर्णय घेतला. नदीत पाणीच नाही अशी बतावणी करणारी हुशार लोकं युती सरकारमध्ये होती. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात बराच अभ्यास करून योग्य नियोजन केले. जतच्या उर्वरित भागासाठी सहा टीएमसी पाणी देऊन जत विस्तारित योजनेचे काम सुरू केले. जवळपास 120 गावांना या नियोजनाचा फायदा होणार आहे असे त्यांनी सांगितले.
बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात धनशक्तीचा वापर, Video शेअर करत रोहित पवारांचा गंभीर आरोप
महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहता पुढच्या विधानसभा निवडणुकीत आपले सरकार येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सरकार आल्यानंतर टेंभू योजनेतील उर्वरित सर्व कामे एका वर्षाच्या आत पूर्ण करू असेही त्यांनी आश्वासन दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List