सुंदर पिचाई अब्जाधीश होण्यापासून एक पाऊल दूर
अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई अब्जाधीश होण्यासाठी फक्त एक पाऊल दूर आहेत. सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वात कंपनीच्या शेअर्समध्ये 400 टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सने मुसंडी मारली. यामुळे बाजारातील भाकीतही खोटे ठरले. नुकतीच पंपनीने तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली. पंपनी पहिल्यांदा इतकी मोठी फायद्यात राहिली. या सर्वांचा फायदा पिचाई यांना होत आहे. जगात सर्वात जास्त कमाई करणाऱया सीईओंच्या यादीत सुंदर पिचाईंचा समावेश झाला आहे. गेल्या नऊ वर्षांपासून गुगलचे सीईओ म्हणून पिचाई काम करत आहेत.
संपत्ती किती
मूळचे हिंदुस्थानी असलेले पिचाई यांच्या एकूण संपत्तीत सध्या असलेल्या शेअर्सचे मूल्य 42.4 कोटी डॉलर आहे. त्यांची संपत्ती जवळपास 1 अब्ज डॉलर झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List