‘हे बेबी’मधील ‘एंजल’ 17 वर्षांनंतर दिसते अशी; खळी पाहून नेटकरी म्हणाले..

‘हे बेबी’मधील ‘एंजल’ 17 वर्षांनंतर दिसते अशी; खळी पाहून नेटकरी म्हणाले..

अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘हे बेबी’ हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने कधी प्रेक्षकांना हसवलं तर कधी भावूकसुद्धा केलं. साजिद खान दिग्दर्शित हा चित्रपट ‘थ्री मेन अँड अ बेबी’ या अमेरिकी चित्रपटावर आधारित होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यामध्ये या तीन मुख्य अभिनेत्यांशिवाय एक गोड मुलगीसुद्धा होती. क्युट दिसणाऱ्या एंजलने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. चित्रपटात एंजलच्या भूमिकेत दिसणाऱ्या या चिमुकलीचं खरं नाव जुआना संघवी असं आहे. आता तीच चिमुकली मोठी झाली असून 17 वर्षांनंतर तिचे फोटो व्हायरल होत आहेत. जुआनाचे आताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

जुआनाने ‘हे बेबी’ या चित्रपटातून केवळ प्रेक्षकांची मनं जिंकली नव्हती तर त्यातील कलाकारांनाही तिने प्रभावित केलं होतं. जानेवारी 2022 मध्ये फरदीन खानने ‘हे बेबी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर केला होता. ‘छोट्या जुआनासोबत सीन शूट करण्यासाठी मी सिगारेट पिणं सोडून दिलं होतं’, असं त्याने सांगितलं होतं. चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खानसारखे नामवंत कलाकार असताना चिमुकल्या मुलीने सर्वांच लक्ष तिच्याकडे वेधलं होतं. हीच जुआना आता 20 वर्षांची झाली आहे. तिचे आताचे फोटो पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.

 

View this post on Instagram

 

A post shared by ASA photographers (@asaphotographers)

जुआनाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. तिच्या गालावरील खळी पाहून नेटकरी तिची तुलना प्रिती झिंटाशी करत आहेत. अनेकांनी तिला बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याचा सल्ला दिला आहे. ‘हे बेबी’नंतर जुआना नंतर कोणत्याच चित्रपटात किंवा जाहिरातीत झळकली नाही. ती सध्या लाइमलाइटपासून दूर असून शिक्षणावर लक्ष केंद्रीत करत आहे. तिचं इन्स्टाग्राम अकाऊंटसुद्धा प्रायव्हेट आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;