तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एकाला अटक
घरी आल्यावरून झालेल्या वादातून तरुणाला धक्काबुक्की केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. सिराज शेख असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद करून अमिर कुरेशीला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
सलमान हा वांद्रे परिसरात राहत होता. सिराजला फुप्फुसाचा संसर्ग झाल्याने त्याच्यावर दोन वर्षांपूर्वी शस्त्रक्रियादेखील झाली होती. मंगळवारी रात्री सिराज हा त्याच्या मित्राकडे आला. त्यानंतर ते दोघे वांद्रे तलाव येथे मोटारसायकलने फेरफटका मारण्यासाठी गेले. तेथे त्याच्या मित्राने मोटारसायकल पार्क केली. काही वेळाने तेथे आमिर आला. तेव्हा आमिरने सिराजसोबत घरी आल्यावर आपल्याकडे दुर्लक्ष का केले यावरून वाद घातला. तेव्हा सिराजने तू तुझं काम कर असे त्याला सांगितले. त्यानंतर सिराज आणि आमिरमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आमिरने सिराजच्या छातीवर जोराचा धक्का मारल्याने तो खाली पडला. सिराजला रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List