नेहमीप्रमाणे मोदींनी निर्लज्ज मौन बाळगलंय; राहुल गांधींचा हल्लाबोल, प्रियांका गांधीचीही घणाघाती टीका
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना कर्नाटकमध्ये माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि एनडीएचे उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णा यांचे सेक्स स्कँडल उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याच रेवण्णासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जाहीर सभा घेत त्यांना निवडून देण्याचे आवाहनही केले होते. मात्र हे सेक्स स्कँडल बाहेर आल्यापासून यावर मोदी आणि भाजपने मौन बाळगले आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी भाजपच्या या बोटचेप्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परखड शब्दात हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे कर्नाटकमध्ये महिलांविरोधात घडलेल्या घृणास्पद गुन्ह्याबाबत निर्लज्ज मौन बाळगले आहे. सर्व काही माहिती असतानाही भाजपने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तीचा प्रचार का केला? फक्त मतासाठी? इतका मोठा गुन्हेगार देश सोडून पळून जाऊच कसा शकतो? याचे उत्तर मोदींना द्यावे लागेल, असा जोरदार हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.
कैसरगंजपासून कर्नाटकपर्यंत आणि उन्नावपासून उत्तराखंडपर्यंत महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना पंतप्रधानांचे मूक समर्थन देशभरातील गुन्हेगारांचे धैर्य वाढवत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. तसेच मोदींच्या ‘राजकीय कुटुंबाचा’ भाग असणे ही गुन्हेगारांसाठी ‘सुरक्षेची गँरंटी’ आहे का? असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला.
कर्नाटक में महिलाओं के साथ हुए वीभत्स अपराध पर भी नरेंद्र मोदी ने हमेशा की तरह शर्मनाक चुप्पी साध ली है।
प्रधानमंत्री को जवाब देना होगा:
सब कुछ जान कर भी सिर्फ वोटों के लिए उन्होंने सैकड़ों बेटियों का शोषण करने वाले हैवान का प्रचार क्यों किया?
आखिर इतना बड़ा अपराधी बड़ी…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 1, 2024
दरम्यान, प्रियांका गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्ला चढवला आहे. ही मंडळी (भाजप) महिलांच्या सुरक्षेच्या बाता मारतात. पण कर्नाटकात काय घडले ते सर्वांनी पाहिले. त्यांच्याच पक्षाशी संबंधित लोकांनी भयंकर गुन्हा केला असून याचा व्हिडीओही समोर आले. या गुन्हेगारासाठी मोदींनी सभा घेतल्या. तो देश सोडून पळून गेला तेव्हा ना मोदींनी थांबवले, ना शहांनी. महिलांविरोधात गुन्हे घडतात तेव्हा मोदी मौन बाळगतात, किंबहुणा ते गुन्हेगारांचे सरक्षणच करतात. मणिपूरमध्ये एका जवानाच्या पत्नीची नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. त्याचा व्हिडीओही समोर आला. मोदी-शहांनीही तो व्हिडीओ पाहिला असेत. मग ते यावर मौन का? असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List