म्हणे, धुव राठी दाऊदच्या बंगल्यात राहतो! फेक न्यूजवरून सोशल मीडियावर राडा

म्हणे, धुव राठी दाऊदच्या बंगल्यात राहतो! फेक न्यूजवरून सोशल मीडियावर राडा

प्रसिद्ध यूटय़ुबर ध्रुव राठीने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टवरून खोटय़ा दाव्यावर सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली असून या पोस्टच्या दाव्यानुसार, ध्रुव राठी याचे खरे नाव बदरुद्दीन राशीद लाहौरी आहे. तसेच त्याची पत्नी जुली पाकिस्तानी नागरिक आहे. तिचे नाव जुलेखा आहे. ध्रुव राठी आणि त्याची पत्नी पाकिस्तानच्या कराचीमधील पाक आर्मीच्या सुरक्षेत दाऊद इब्राहिमच्या बंगल्यात राहतात, असा दावा करण्यात आला आहे. ध्रुव राठीला लक्ष्य करण्यासाठी ही पोस्ट टाकण्यात आली. परंतु ध्रुव राठीने या बोगस पोस्टला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या लोकांकडे माझ्या व्हिडीओला उत्तर देण्यासाठी कोणतेही उत्तर नाही. त्यामुळे हे लोक असे खोटे दावे करत आहेत. हे लोक किती हताश आहेत. माझ्या पत्नीच्या कुटुंबाला यात ओढत आहेत. तुम्ही या आयटी सेल कर्मचाऱयांची घृणास्पद मानसिकता पाहू शकता. ध्रुव राठीने या पोस्टला फेक न्यूज आहे, असे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;