सोसायटीच्या पैशावर डल्ला मारणारा गजाआड

सोसायटीच्या पैशावर डल्ला मारणारा गजाआड

 पैशाची गरज असल्याने सोसायटीच्या पदाधिकाऱयांच्या सह्या मारून चेकद्वारे पैसे काढणाऱयाला अखेर कांदिवली पोलिसांनी अटक केली. अजय शहा असे त्याचे नाव आहे.

कांदिवली पश्चिम येथे एक सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये अजय हा मॅनेजर म्हणून काम करायचा. सोसायटीचे आर्थिक व्यवहार, सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचाऱयांच्या पगाराचे तो काम करायचा. सोसायटीची कागदपत्रे आणि चेक अजयकडे असायचे. त्या सोसायटीचे एका बँकेत खाते आहे. एप्रिल महिन्यात त्या सोसायटीमध्ये एक महिला आली. तिने अजयने सोसायटीच्या चेकवर पदाधिकाऱयांच्या सह्या करून पैसे काढल्याचे सांगितले. हा प्रकार समजताच सोसायटीच्या पदाधिकाऱयाने बँकेत धाव घेतली. बँक खात्याचा तपशील तपासला असता खात्यातून 3 लाख 35 हजार रुपये काढल्याचे लक्षात आले. त्यानंतर सोसायटीच्या पदाधिकाऱयाने अजयकडे विचारणा केली. सोसायटीने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;