भाऊ वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून..; प्रसाद ओकने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग

भाऊ वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून..; प्रसाद ओकने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग

कोरोना काळात लॉकडाऊन असताना अनेक चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग बायो-बबलमध्ये करण्यात आलं होतं. कोरोनाची पहिली लाट येऊन गेल्यानंतर सरकारने बायो-बबलमध्ये शूटिंग करण्यास परवानगी दिली होती. अशाच बायो-बबलमध्ये सर्व कडक नियम पाळून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोचं शूटिंग सुरू होतं. या शूटिंगदरम्यानचा एक कठीण प्रसंग अभिनेता प्रसाद ओकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला. कोरोना काळातच प्रसादने त्याच्या वडिलांना गमावलं होतं.

बायो-बबलमध्ये शूटिंग

‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्यूब चॅनलच्या ‘इनसाइडर्स’ कार्यक्रमात प्रसाद त्याविषयी व्यक्त झाला. “कोरोनाची पहिली लाट येऊन गेल्यानंतर आपण सगळेच एका अनामिक भीतीत जगत होतो. कोरोनाची थोडी झळ कमी झाल्यानंतर सरकारने बायो-बबलमध्ये शूटिंग करण्याची परवानगी दिली होती. पण त्यासाठी मुंबईबाहेर जाणं गरजेचं होतं. बायो-बबलमध्ये शूट करताना युनिटमधील एकही माणूस त्या जागेतून बाहेर जाणार नाही आणि नवा माणूस आत येणार नाही. अशा कडक नियमांमध्ये आम्ही काम करत होतो. या शूटिंगसाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं युनिट मुंबईबाहेर दमणला पोहोचलं होतं”, असं त्याने सांगितलं.

कोरोना काळात वडिलांचं निधन

“दमणमधील एका हॉटेलमध्ये शोचा सेट उभारला गेला होता आणि तिथेच शूटिंग करण्यात येणार होती. 29 एप्रिलला आम्ही दमणला पोहोचलो. त्यानंतर 30 एप्रिल रोजी पहिल्या एपिसोडचं शूटिंग सकाळी 9 वाजता सुरू होणार होतं. आम्ही सकाळी 6-7 वाजता उठलो. मी उठून फ्रेश झाल्यावर फोन बघितला तर बायकोचे आठ ते दहा मिस्ड कॉल होते. तिला फोन करताच मला समजलं की माझे वडील गेले. पुण्यात माझे खूप चांगले मित्र आहेत. एका मित्राच्या माध्यमातून मी पुण्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना मी विचारलं की आपण काय करू शकतो? तर ते म्हणाले, साहेब परिस्थिती खूप वाईट आहे. पार्थिव अर्धा-पाऊण तास ठेवण्याची आम्हाला परवानगी आहे. तुम्हाला दमणहून पुण्याला यायला किमान सहा ते सात तास लागतील. आम्ही एवढा वेळ प्रतीक्षा करू शकत नाही. परिस्थिती खूप बिकट आहे. मी काहीच करू शकत नाही”, असं तो पुढे म्हणाला.

अंत्यविधीला पोहोचू शकला नाही प्रसाद

कोरोनामुळे प्रसाद त्याच्या वडिलांच्या अंत्यविधीला पोहोचू शकला नव्हता. त्यावेळी त्याने भावाला व्हिडीओ कॉलद्वारे वडिलांना अखेरचं पाहण्याची विनंती केली. मात्र नियमांमुळे तेही शक्य झालं नव्हतं. वडिलांजवळ असलेल्या प्रसादच्या भावाला तिथे मोबाइल नेण्याची परवानगी नव्हती आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही व्हिडीओ कॉल करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे प्रसाद त्याच्या वडिलांना शेवटचं पाहूच शकला नव्हता. “थोड्या वेळाने भाऊ तिथे वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देत होता आणि मी इथे हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून स्किट बघत होतो”, अशा शब्दांत प्रसादने भावना व्यक्त केल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;