एआयची कमाल… झपाटलेला-3’मध्ये लक्ष्याची एंट्री!
‘झपाटलेला-3’ चित्रपटाबद्दल नवीन अपडेट समोर आलीय. ‘झपाटलेला-3’ या चित्रपटात चक्क सर्वांचा लाडका ‘लक्ष्या’ म्हणजेच दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे पाहायला मिळणार आहेत. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (एआय) मदत घेतली जाणार आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महेश कोठारे म्हणाले, ‘‘लक्ष्या माझा जिवलग मित्र होता. आजही तो माझ्याबरोबर आहे, मला मार्गदर्शन करतो असे मला वाटते. लक्ष्मीकांतने खूप चित्रपट केले. त्यात लक्षात राहणारे जे चित्रपट आहेत ते माझ्यासोबत होते. आमचे गणित वेगळे होते. पछाडलेला हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. त्याच वर्षी तो गेला.’’
पुढे ते म्हणाले, ‘‘मला लक्ष्मीकांत बेर्डे याच्यासोबत पुन्हा काम करण्याची इच्छा आहे. एआयचा उपयोग करून मला लक्ष्मीकांतला रिक्रिएट करायचेय. लक्ष्मीकांतला मी स्क्रीनवर आणणार. पुन्हा महेश – लक्ष्याची जोडी दिसणार.’’ 2025मध्ये ‘झपाटलेला-3’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असला तरी आतापासूनच या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढलीय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List