माजी विश्वस्त मंडळाने केला 500 कोटींचा अपहार; लीलावती रुग्णालयाच्या नवनिर्वाचित विश्वस्तांचा आरोप   

माजी विश्वस्त मंडळाने केला 500 कोटींचा अपहार; लीलावती रुग्णालयाच्या  नवनिर्वाचित विश्वस्तांचा आरोप   

वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या विश्वस्तांनी वैद्यकीय उपकरणे आणि गरिबांवरील उपचारांसाठी मिळालेल्या निधीतून तब्बल 500 कोटींच्या निधीचा उपहार केल्याचा आरोप नवनिर्वाचित विश्वस्त मंडळातील कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत मेहता यांनी पत्रकार परिषदेत केला.

मुंबईत 1978 साली वांद्रे येथे बांधण्यात आलेल्या लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे पब्लिक ट्रस्ट रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या कामकाजावर धर्मादाय आयुक्त देखरेख करतो. रुग्णालयाचे कायमस्वरूपी विश्वस्त किशोर आणि चारू मेहता यांनी घरातील काही सदस्यांची विश्वस्त म्हणून नेमणूक केली. मात्र नियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळातील निकेत मेहता, रश्मी मेहता, भावेन, चेतन मेहता आणि इतर सदस्यांनी मूळ संस्थापक-विश्वस्त किशोर आणि चारू मेहता यांना अंधारात ठेवून रुग्णालयाच्या नावाने आलेल्या तब्बल 500 कोटींचा अपहार केला. यात वकील आणि सल्लागारांना फी पोटी 200 कोटी, माहीम आणि लोणावळ्यात तसेच गुजरातमधील पालनपूर येथे मालमत्ता खरेदी अशी अनेक प्रकरणे आहेत. मात्र अशा प्रकारे ट्रस्टच्या पैशाचा गैरवापर करणे हे कायद्यात बसत नाही, असे प्रशांत मेहता यांनी सांगितले. या वेळी विश्वस्त मोहित माथूर, सौरभ शर्मा आणि वकील-सल्लागार असीम उपस्थित होते.

फॉरेन्सिक ऑडिटमुळे प्रकरण आले उघडकीला

नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाने नुकत्याच केलेल्या फॉरेन्सिक फायनान्शिअल ऑडिट अहवालामुळे जुन्या विश्वस्त मंडळाने केलेल्या 500 कोटी रुपयांच्या अपहाराचा भंडापह्ड झाला, असा दावा विश्वस्त प्रशांत मेहता यांनी केला. माजी विश्वस्त मंडळाने केलेला हा या शतकातील सर्वात मोठा वैद्यकीय घोटाळा असल्याचा दावाही प्रशांत मेहता यांनी केला.

ईडी, सीबीआयकडून तपास करणार

लीलावती रुग्णालयात झालेला अपहाराचा हा प्रकार गंभीर असून याचा ईडी आणि सीबीआयकडून तपास करण्यात यावा, यासाठी आम्ही प्रयत्न करू. अपहार करणाऱयांच्या मालमत्ता जप्त करून ट्रस्टचा पैसा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करू, असेही प्रशांत मेहता म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;