गुगलची गुगली! सर्च इंजिन ठप्प झाल्याने नेटकरी वैतागले

गुगलची गुगली! सर्च इंजिन ठप्प झाल्याने नेटकरी वैतागले

जगातलं सगळ्यात मोठं सर्च इंजिन अशी ओळख असलेलं गुगल ठप्प झाल्याचं वृत्त आहे. गुगलच्या माहितीअभावी जगभरातले नेटकरी वैतागले आहेत. त्यामुळे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याविषयीचा अनुभव शेअर करत आहेत. गुगलवर क्लिक करण्यात अडचणी येत असून वेबसाईटच्या टॅबवर 502 Error असं दाखवण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटरनेटच्या तक्रारी नोंदवणाऱ्या डाऊन डिटेक्टर या संस्थेने या विषयीचा अहवाल दिला आहे. गुगलवर सर्च करण्यात अडचणी येत असून गुगल पुरवत असलेल्या इतर काही सेवाही ठप्प झाल्या आहेत. यात ब्रिटनमधून 300 तर अमेरिकेतून 1400हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. सुदैवाने यात जीमेल, यूट्युब, गुगल टॉक चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.

गुगल हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन आहे. सगळं काही शोधून देण्याची हमखास खात्री नेटकऱ्यांना गुगल देतं. त्यामुळे माहिती मिळवण्यासाठी गुगलवर भरवसा ठेवता येतो. पण, आता त्यानेच गुगली केल्याने नेटकरी हैराण झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;