85 वयोगटावरील मतदारांचे घरबसल्या मतदान
85 वयोगटावरील मतदारांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 85 पेक्षा अधिक वय वर्ष असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान घेण्यास सुरुवात झाली आहे. या मतदार संघात 34 हजार 111 मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची इच्छा व्यक्त करण्याबाबतचे अर्ज वाटले होते. त्यापैकी 3 हजार 583 मतदारांनी घरबसल्या मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
85 वयोगटावरील मतदारांना मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करणे हे शारीरिक त्रासाचे होते. अनेकवेळा ही वयोवृध्द मंडळी मतदान करण्याचे टाळतात. अशावेळी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून यंदा लोकसभा निवडणूकीत पहिल्यांदाच 85 वयोवर्षावरील मतदारांना घरबसल्या मतदान करण्याचा हक्क दिला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 हजार 583 मतदारांनी घरबसल्या मतदान करण्याचा पर्याय निवडला आहे. ज्या 85 वयोगटावरील मतदारांनी घरबसल्या मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यांच्या घरी दोनवेळा निवडणूक कर्मचारी मतदान घेण्यासाठी जाणार आहेत. संबंधित मतदार दोन्हीवेळा उपलब्ध झाला नाही तर त्या मतदाराला पुन्हा मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List