T20 World Cup : वर्ल्डकपमध्ये हे 4 संघ खेळतील सेमीफाइनल; मायकेल वॉनचा अजब दावा

T20 World Cup : वर्ल्डकपमध्ये हे 4 संघ खेळतील सेमीफाइनल; मायकेल वॉनचा अजब दावा

T20 वर्ल्डकप 2024 सुरू होण्यास आता एक महिनाच शिल्लक आहे. त्यामुळे सगळे देश आपापल्या संघांची घोषणा करत आहेत. दरम्यान टीम इंडियानेही टी-20 वर्ल्डकपसाठी आपल्या खेळांडूंच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. हार्दिक पंड्याची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वर्ल्ड कप सुरू होण्यास अजून बराच काळ असला तरी काही चाहत्यांनी आणि तज्ज्ञांनी आतापासूनच भाकित करायला सुरुवात केली आहे. अशाच एका तज्ञाने टीम इंडिया उपांत्य फेरीतही पोहोचू शकणार नाही, असा दावा केला आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सुप्रसिद्ध समालोचक मायकेल वॉन आपल्या विचित्र दाव्यांमुळे आणि बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. वॉनने आता देखील टी-20 विश्वचषकाबाबत मोठं भाकित केलं आहे. 2024 च्या वर्ल्डकपमध्ये कोणते संघ फायनलपर्यंत पोहोचतील याबाबत त्याने माहिती दिली आहे. ही माहिती त्यांनी स्वत: च्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. मायकेल वॉनने ट्विटमध्ये टी-20 वर्ल्डकपसाठी उपांत्य फेरीतील संघाचा खुलासा केला. वॉनच्या मते, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत पोहोचतील, असे त्याचे मत आहे.

मायकेल वॉनची पोस्ट पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी त्याला उत्तरे द्यायला सुरुवात केली. एका युजरने वॉनचा 2023 मधील ट्वीटचा स्क्रिनशॉट पुन्हा एकदा शेअर केला आहे. ज्यात गेल्या वर्षी वॉनने दावा केला होता की भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचतील. परंतु यामध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेच नव्हते. तसेच वॉनच्या ट्विटमध्येही उल्लेख नसलेल्या ऑस्ट्रेलियानेही विजय मिळवला होता. त्यामुळे चाहते वॉनने केलेल्या भाकिताची खिल्ली उडवत आहेत. कारण याआधीही मालिका किंवा टूर्नामेंटबाबत वॉनचे भाकित अनेकदा चुकीचे ठरले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;