कॉलेज तरुणीचा खून केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप; 10 हजाराचा दंड

कॉलेज तरुणीचा खून केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप; 10 हजाराचा दंड

संगमेश्वर तालुक्यातील लोवले कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीचा खून झाला होता. मात्र 6 वर्षानंतर या खटल्याचा निकाल झाला. परिस्थितीजन्य पुरावा व वैद्यकीय पुराव्याच्या आधारे सरकारी अभियोक्ता ॲड.प्रफुल्ल साळवी यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने आरोपीला भादवी कलम 302 अन्वये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

सुनिल रामचंद्र गुरव ( वय 47, रा. फणसवणे-गुरवाडी, ता. संगमेश्वर) असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना 1 जानेवारी 20218 ला घडली होती. मयत विशाखा अजय महाडीक (वय 19, रा. कसबा, ता. संगमेश्वर) ही लोवले कॉलेज येथे शिकत होती. तिचा आरोपी सुनिल यांचा मुलगा महेंद्र गुरव याच्याशी प्रेमसंबध होते. त्यांचा विवाह शिक्षण संपल्यानंतर करण्याचा मानस कुटुंबाचा मानस होता. 1 जानेवारीला विशाखा ही कॉलेजला जाते सांगून घरातून निघून गेली होती. ती घरी आली नाही. तिच्या आईने दुसऱ्यादिवशी विशाखा हरवल्याची खबर पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिस बेपत्ता विशाखाचा शोध घेत होते. त्यानंतर 26 डिसेंबरला 20218 ला प्रसाद दिगंबर अपडकर (रा. देवळे) याला खांबटमाड येथील त्याच्या बागेजवळ एका स्त्रीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तत्काळ देवरुख पोलीस ठाण्यात माहिती दिली.

तपासात हा मृतदेह विशाखाचा असल्याचे समजले. विशाखाचे वडिल अजय महाडीक यांनी पोलिसांत याबाबत तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक एस. एल. पाटील यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी मोबाईल कॉल डिटेल्स व इतर पुरावे आधारे सुनिल गुरव याने खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली. तपासात आरोपी सुनिल याने मयत विशाखाचा मोबाईल व घड्याळ मुंबई येथील रुम मधून काढून दिले. चप्पल व सॅक फेकलेल्या जागा पोलिसांना दाखवल्या तेथेच विशाखाची सॅन्डल मिळाली.

दरम्यान पेपर मधील मयताचा फोटो पाहून देवरुख येथील रिक्षावाला पवन भोईर यांनी पोलिसांना सांगितले की, 1 डिसेंबर 2018 ला विशाखा व आरोपी सुनिल याला मोगरवणे स्टॉपला सोडले. तसेच साक्षीदार रिक्षा व्यवसायिक अनिल पाटेकर याने 2 डिसेंबर 2018 ला खुनाच्या दुसऱ्या दिवशी आरोपीला देवरुख ते मोगरवणे व पुन्हा देवरुख येथे सोडल्याचे सांगितले. तपास कामात मयत विशाखाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा पुरावा नसल्याने खटला आव्हानात्मक होता. त्यामुळे केवळ परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालयासमोर दोषारोप सरकारी पक्षातर्फे ठेवण्यात आले होते.

हा खटला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात झाला. सरकारी अभियोक्ता अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी परिस्थितीजन पुरावा व वैद्यकीय पुरावा शाबीत करण्यासाठी एकूण 28 साक्षदार तपासले. जवळपास 6 वर्षे चाललेल्या खटल्यामध्ये परिस्थितीजन्य पुरावा, सरकारी वकीलांचा युक्तीवाद व 30 हून अधिक खटला लॉ या सर्वांचा विचार करुन सरकारीपक्षास आव्हानात्मक असणारी खटल्यात आरोपीला भादव कलम 302 अन्वये जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपये दंड व कलम201 अन्वये 3 वर्षे सश्रम कारवास व 1हजार दंड, दंडाच्या रक्कमेपैकी 8 हजार रक्कम नुकसान भरपाई म्हणून पिडीत कुटुंबाला देण्याच आदेश झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;