‘श्रीवल्ली’ची 100 किलोंची डेडलिफ्ट पाहून चाहते थक्क! म्हणाले ‘फ्लॉवर नाही फायर आहे ही!’

‘श्रीवल्ली’ची 100 किलोंची डेडलिफ्ट पाहून चाहते थक्क! म्हणाले ‘फ्लॉवर नाही फायर आहे ही!’

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘गुडबाय’ हा तिचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटात काम केल्यानंतर तिची बॉलिवूड इंडस्ट्रीतही जोरदार चर्चा होऊ लागली आहे. रश्मिकाचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. ‘नॅशनल क्रश’ म्हणून ती ओळखली जाते. इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रिय असलेल्या रश्मिकाने नुकताच एक फोटो शेअर केला. यामध्ये ती डेडलिफ्ट करताना दिसून येत आहे. या फोटोसोबतच तिने तिचं रुटीनसुद्धा सांगितलं आहे. व्यग्र वेळापत्रक आणि अनेक तासांच्या शूटिंगनंतरही फिटनेसकडे पूर्ण लक्ष देत असल्याचं रश्मिकाने म्हटलंय. रश्मिकाचं 100 किलो डेडलिफ्ट पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

या पोस्टमध्ये तिने लिहिलं, ‘प्रिय डायरी, गेल्या अनेक दिवसांपासून मी रात्रीचं शूटिंग करतेय. त्यामुळे कुठून सुरुवात करावी हेच मला सुचत नाहीये. रात्रीच्या शूटिंगनंतर मी माझ्या रुममध्ये सकाळी 8 वाजता आली. थोडंफार खाल्लं पण मला अजिबात झोप येत नव्हती. त्यामुळे मी पुस्तक वाचायला घेतलं आणि दुपारी 12 च्या सुमारास माझा डोळा लागला. संध्याकाळी 6 वाजता मला जाग आली, तेव्हा मला काही कार्डिओ करावंसं वाटलं. पण मी केलं नाही. त्यामुळे फोनवर थोडंसं काम केलं आणि पुस्तक वाचलं. हे सर्व करताना मला पुन्हा भूक लागली (नेहमीप्रमाणे) त्यामुळे थोडंसा खाऊ खाल्ला.’

‘मध्यरात्री 1 वाजता मी वर्कआऊट करायला गेले. आज 100 किलोंचं डेडलिफ्ट केलं. पायाचेही काही व्यायाम केले. त्यामुळे मला पॉवरफुल झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर चित्रपट पाहिला आणि आता माझ्या गुडघ्यांनाही चांगला आराम मिळाला आहे. त्यामुळे मी पुन्हा धावण्यासाठी उत्सुक आहे. व्यायामानंतर माझ्या रुममध्ये आले आणि जेवले. जेवणानंतर शूटिंगसाठी निघाली. धनुष सर, शेखर सर, निकेत आणि कुबेरा यांच्यासोबत शूटिंग करण्यात खूप मज्जा येते. आज 30 तारीख आहे आणि सकाळचे 7 वाजलेत. तरीही मला अजून झोप आली नाही. माझ्या झोपेचं वेळापत्रक पूर्णपणे बिघडलं आहे’, असं तिने पुढे लिहिलंय.

रश्मिका सध्या ‘पुष्पा 2: द रुल’ आणि ‘कुबेर’ या चित्रपटांसाठी शूटिंग करत आहे. याशिवाय ती ‘गर्लफ्रेंड’, ‘छावा’, ‘रेनबो’, ‘ॲनिमल पार्क’, ‘डी 51’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;