महायुतीच्या प्रचारसभेत कार्यकर्त्यांच्या तोंडी राहुल गांधींचे नाव, मिंधे गटाची गोची

महायुतीच्या प्रचारसभेत कार्यकर्त्यांच्या तोंडी राहुल गांधींचे नाव, मिंधे गटाची गोची

आता महायुतीच्या प्रचारसभेतही स्धानिक नेते आणि कार्यकर्त्यांच्या तोंडी इंडिया आघाडी आणि राहुल गांधींचे नाव निघू लागल्याचे पाहायला मिळत आहेत. मिंधे गटाचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या कागल येथील प्रचार सभेतच भाजपच्या एका स्थानिक नेत्यांने पंतप्रधान म्हणून आपला देश तुम्ही राहुल गांधी यांच्या हातात देणार की नरेंद मोदी यांच्या?, या थेट प्रश्नावर उपस्थित एका कार्यकर्त्याकडूनही थेट राहुल गांधी यांचेच नाव घेतल्याने, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची चांगलीच गोची झाली. त्यांनी हसण्यावर वेळ मारून नेली असली तरी देशात सर्वत्र इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच बोलबाला सुरू असल्याचे वास्तविक चित्र दिसून येत आहे.

महायुतीचे उमेदवार खास.संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कागल येथे सोमवारी रात्री प्रचार सभा झाली.यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री हसन मुश्रीफ,खासदार धनंजय महाडिक, उमेदवार संजय मंडलिक तसेच कागलच्या घाटगे घराण्यातील (ज्युनिअर सरकार) अखिलेशसिंह घाटगे व त्यांच्या बहीण शौमिका महाडिक प्रमुख उपस्थित होत्या. भाजपच्या स्थानिक नेत्या असलेल्या शौमिका महाडिक यांनी आपल्या भाषणात थेट मुद्द्याला हात घातला. देशात भाजपकडून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी, तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडे काँग्रेसचे राहुल गांधीं पंतप्रधानपदासाठी पर्याय असून, पंतप्रधान म्हणून आपला देश तुम्ही राहुल गांधी यांच्या हातात देणार की नरेंद मोदींच्या हातात..? असा सवाल शौमिका महाडिक यांनी समोरच्या कार्यकर्त्यांना विचारला. यावेळी काही क्षणांच्या शांततेत व्यासपीठाजवळच उभा असलेल्या एका युवा कार्यकर्त्यांने थेट राहुल गांधी म्हटल्याने, पुन्हा सर्वजण स्तब्ध झाले. या शांततेच शौमिका महाडिक यांच्यासह मंत्री हसन मुश्रीफ आदींनी हसण्यावर वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याने, महायुतीच्या नेत्यांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे दिसून येत आहेत.

पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;