‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीचा भाजपात प्रवेश; युजर्स म्हणाले ‘आता करिअर संपलं’

‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीचा भाजपात प्रवेश; युजर्स म्हणाले ‘आता करिअर संपलं’

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ आणि ‘अनुपमा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री रुपाली गांगुलीने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर काही सेलिब्रिटींप्रमाणेच रुपालीनेही राजकीय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली आहे. रुपाली ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. बुधवारी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात तिने विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पक्षप्रवेश केल्यानंतर रुपालीने राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला आणि भाजप हा पक्ष का निवडला यामागचं कारण सांगितलं आहे.

माध्यमांशी बोलताना रुपाली म्हणाली, “एक नागरिक म्हणून आपण सर्वांनी यात सहभागी व्हायला हवं. महाकाल आणि माताराणीच्या आशीर्वादाने मी माझ्या कलेच्या माध्यमातून अनेकांना भेटते. मला त्यांची काळजी आहे. विकासाचं हे महायज्ञ पाहिल्यावर मलाही त्यात सहभागी होण्याची इच्छा निर्माण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी आणि या देशाची सेवा करण्यासाठी मी या पक्षात प्रवेश केला आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वात पुढे जाण्याची आणि असं काही काम करण्याची इच्छा आहे, ज्यामुळे त्यांना एकेदिवशी माझा अभिमान वाटेल. या प्रवासात मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, जेणेकरून मी माझं काम योग्य आणि चांगल्या प्रकारे करू शकेन.”

रुपाली गांगुलीने भाजपात प्रवेश करताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ‘ही भविष्यातील स्मृती इराणीच आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘आता अनुपमा राजकारणातही ड्रामा करेल’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘करिअर संपला’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

रुपालीचे वडील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथालेखक अनिल गांगुली आहेत. वडिलांची प्रकृती ठीक नसताना त्यांच्या उपचाराचा खर्च उचलण्यासाठी रुपालीने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती. स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ ही तिची मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. यामध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली मुख्य अनुपमाची भूमिका साकारतेय. टीआरपीच्या यादीत ही मालिका नेहमीच अग्रस्थानी असते. लॉकडाऊनच्या काळात सुरू झालेल्या या मालिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या मालिकेमुळे रुपाली सर्वसामान्यांमध्येही ‘अनुपमा’ म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;