ऐश्वर्या राय हिला हात लावून सीन समजावत होता दिग्दर्शक, भडकलेला सलमान खान म्हणाला…

ऐश्वर्या राय हिला हात लावून सीन समजावत होता दिग्दर्शक, भडकलेला सलमान खान म्हणाला…

अभिनेता सलमान खान याचं नाव अनेक सेलिब्रिटी महिलांसोबत जोडण्यात आलं. पण अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत असलेल्या नात्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय याच्या नात्याचा चॅप्टर आज प्रत्येकाला माहिती आहे. दोघांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील चाहत्यांमध्ये दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगलेल्या असतात. ‘हम दिल जे चुके’ सिनेमात दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमाची शूटिंग सुरु असतानाच दोघांमध्ये प्रेम बहरलं.

‘हम दिल जे चुके’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना दिग्दर्शक संजय लिला भन्साळी ऐश्वर्या हिला हात लावून सीन समजावत होते. तेव्हा संतापलेल्या सलमान खान, संजय भन्साळी यांना सुनावलं होतं. रिपोर्टनुसार, . ‘हम दिल जे चुके’ सिनेमात ऐश्वर्या हिच्या आईची भूमिका साकारणाऱ्या स्मिता जयकर यांनी याबद्दल खुलासा केला होता.

स्मिता जयकर म्हणाल्या, ‘मला आंखो की गुस्ताखियां गाण्यातील एक सीन आठवत आहे. सलमान, ऐश्वर्या हिला शोधण्यासाठी सर्वत्र फिरत होता. ऐश्वर्या माझ्या बाजूला येऊन उभी होती. सीन दरम्यान, संजय, ऐश्वर्या जवळ आले आणि ऐश्वर्या हिला स्पर्श करत सीन समजवायला लागले. तेव्हा सलमान खान म्हणाला, संजय सर तुम्ही ऐश्वर्याला स्पर्श का केलं?’

‘तेव्हा ऐश्वर्या आणि सलमान यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र तुफान रंगल्या होत्या. त्याचा फायदा सिनेमाला देखील झाला. दोघांच्या डोळ्यात एकमेकांबद्दल असलेलं प्रेम दिसत होतं…’ असं देखील स्मिता जयकर म्हणाल्या होत्या.. पण सलमान आणि ऐश्वर्या यांचं नातं फार काळ टिकलं नाही.

ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यावर गंभीर आरोप केले. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज ऐश्वर्या पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. तर सलमान खान याने कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

सलमान खान वयाच्या 58 व्या वर्षी देखील एकटाच आहे.ऐश्वर्या नंतर देखील सलमान खान याने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना डेट केलं आहे. अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यापासून अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यापर्यंत सलमान याने अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सलमान खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;