सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण – आरोपी अनुज थापनची आत्महत्या
अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबारप्रकरणी अटकेत असलेला एक आरोपी अनुज थापन याने तुरुंगातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तपासणी करून डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. सलमान खानच्या घरावरगोळीबार प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना 8 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींपेकी बिश्नोई गँगच्या अनुज थापन याने तुरुंगातच आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला ताताडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले आहे.
Salman Khan residence firing case | Accused Anuj Thapan who attempted suicide in custody has been declared dead by doctors at the hospital: Mumbai Police https://t.co/3OMrikn0nP
— ANI (@ANI) May 1, 2024
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना थापनने 40 काडतुसे पुरवली होती. थापन हा बिश्नोई गॅंगशी संबंधित आहे. त्याने 15 मार्च रोजी दोन बंदूका, चार मॅगझीन आणि 40 काडतुसे हल्लेखोर विकी गुप्ता आणि सागर पाल या आरोपींना पुरवली होती. त्यापैकी 17 काडतुसे गुन्हे शाखेच्या हाती लागले आहे. उर्वरित 16 काडतुसांचा तपास करण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List