क्रिकेट टुर्नामेंटनंतर शिवा-आशुच्या मैत्रीचं प्रेमात होणार रुपांतर? मालिकेत रंजक ट्विस्ट
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' मालिकेत खूप रंजक गोष्टी घडत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. किर्तिला चंदन आणि दिव्याच्या प्रेमाबद्दल कळतं. ती प्रिया आणि सुहाससोबत मिळून दिव्याच भांडाफोड करायचा प्लॅन बनवते.
इकडे बिझनेसमध्ये लक्ष नसल्याने रामभाऊ आशुवर चिडतात आणि आशु घर सोडून बाहेर पडतो. शिवाच्या सांगण्यावरून आशुला पटतं की बाबांच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत.
तो जाऊन क्लाएंटशी मीटिंग करतो आणि ती मिटिंग यशस्वी होते. सीताई शिवाच्या घरी कामानिमित्त गेली असता तिला घरातून बाहेर पडणारी शिवा दिसते. ती शिवाबद्दल विचारपूस करते, तेव्हा शिवा शेजारी राहते असं वंदना खोट बोलते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List