तुमची कुंडली बाहेर काढायला लावू नका नीलेश लंके यांचा इशारा

तुमची कुंडली बाहेर काढायला लावू नका नीलेश लंके यांचा इशारा

आतापर्यंत तुम्हाला पचले असेल. मला तुमची कुंडली काढायला लावू नका. तुम्हाला दहशतीसाठी चार गुंड पाळता येत असतील. पण, वेळ आली तर हे गुंड पाय लावून पळून जातील. दुसरीकडे माझ्याकडे असंख्य जिवाभावाचे सहकारी आहेत. पाळणारे गुंड किती पुढे येतात हे मलाही माहिती आहे. माझे सहकारी पळाले तर मी नाव बदलून ठेवील, असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी केडगावातील गुंडगिरी हद्दपार करण्याची ग्वाही दिली.

नगर लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ केडगाव उपनगरात प्रचारफेरी तसेच कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नीलेश लंके बोलत होते.

लंके म्हणाले, ‘आपण ग्रामपंचायत, महानगरपालिका, विधानसभेच्या निवडणुकीत गांभीर्याने मतदान करतो. लोकसभेची निवडणूक देशाच्या हितासाठी महत्त्वाची असते. देशाचे भवितव्य घडविणारी ही निवडणूक असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान वाचविण्याची ही निवडणूक आहे. आज देशाची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. न्यायदेवता म्हणून आपण ज्या संस्थेकडे पाहतो, त्या न्यायसंस्थेला हुकूमशाहीच्या चौकटीत अडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर त्याच पद्धतीने न्यायव्यवस्थेकडून निकाल दिला जातो. केंद्रीय एजन्सीचा वापर करून विविध राज्यांत सत्तांतर करण्याचा प्रयत्न केला जातो. ईडी, सीबीआयचा वापर करून राजकारण्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे चांगले काम करणारे मुख्यमंत्री असताना त्यांनाही तुरुंगात डांबले जात असल्याचा आरोप लंके यांनी केला.’

निवडणुकीला सामोरे जाताना पाच वर्षांत तुम्ही ज्या घोषणा दिल्या, त्या अजेंडय़ावर मते मागणे आपेक्षित आहे. पाच वर्षांच्या काळात काय काम केले, हे जनतेपुढे मांडले पाहिजे. मात्र, विकासाचा काही मुद्दा नाही. त्यामुळे मतदारसंघात साखर, डाळीचे वाटप करण्यात आले. प्रत्येक भागात चार डफडेवाले ठेवण्यात आले असल्याचा आरोप लंके यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;