निलेश लंके समर्थकांना पोलिसांकडून दिला जातोय त्रास; सरपंचावर कारवाईसाठी पाठवला मोठा फौजफाटा

निलेश लंके समर्थकांना पोलिसांकडून दिला जातोय त्रास; सरपंचावर कारवाईसाठी पाठवला मोठा फौजफाटा

नगर दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकांना आता पोलिसांकडून त्रास देण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय दबावातून हे सर्व घडवून आणले जात असल्याची चर्चा आहे. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायतचे सरपंच शरद पवार यांच्यावर कारवाईसाठी अतिरेक्यांना पकडण्यासाठी पाठवतात तसा मोठा फौजफाटा पाठवण्यात आला. या घटनेतून गावात पोलिसांमार्फत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न मंगळवारी करण्यात आल्याची चर्चा होत आहे.

याबाबत सरपंच शरद पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात आपणास मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात जामिनात गावात प्रवेशास मनाई करण्यात आलेली आहे. मात्र मी गावचा सरपंच असल्याने ग्रामपंचायतच्या सर्व बैठका, पाणीपुरवठा विभागाच्या बैठकांना ग्रामपंचायत कार्यालयात येण्यास मुभा देण्यात आलेली आहे. या आदेशाची प्रत आपण नगर तालुका पोलीस ठाण्यात दिली असतानाही मंगळवारी सकाळी आपण ग्रामपंचायतीत बैठकीसाठी गेल्यावर नगर तालुका पोलिसांनी मोठा फौजफाटा गावात आणला. स.पो.नि. प्रल्हाद गिते यांनी ग्रामपंचायत कार्यालयातून आपल्याला बाहेर आणले. पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्या समोर लगेच गाडीमध्ये बसून पोलीस स्टेशनला यायचे आहे, असे धमकावले. याबाबत ग्रामस्थांनी विचारणा केली असता पोलिसांच्या बोलण्यामध्ये विसंगती दिसून आली, असे त्यांनी सांगितले.

सरपंच शरद पवार यांनी सांगितले की, निलेश लंके यांच्या समर्थकांना याप्रकारे खोट्या बोगस कारवाईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या हेतूने गुंतवण्याचे काम सुरू आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून षडयंत्र करत असाल तर आम्ही स्वस्त बसणार नाही. नगर तालुक्यात अनेक ठिकाणचे बेकायदेशीर धंदे, वाढती गुन्हेगारी, चोऱ्या याकडे जाणीवपूर्वक पोलीस दुर्लक्ष करून राजकीय दबावातून आमच्या सारख्यांना खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबत आता आम्ही स्वस्त बसणार नाही. पोलिसांची ही दबंगगिरी थांबली नाही तर पोलीस अधीक्षक राकेश ओला, नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक बाळासाहेब शेखर यांच्याकडे दाद मागणार आहोत. त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर न्यायालयात या पोलिसांविरुद्ध दाद मागणार असल्याचे सरपंच शरद पवार यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;