आगरी सेनेच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
आगरी सेनेचे अध्यक्ष राजाराम साळवी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱया आगरी सेनेच्या शिष्टमंडळाने मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या शिष्टमंडळात आगरी सेनेचे ठाणे ग्रामीण प्रमुख नारायण अंदाडे, रायगड जिल्हाप्रमुख सचिन मते, मुंबई जिल्हाप्रमुख जयेंद्र खुणे, ठाणे जिल्हाप्रमुख चंद्रकांत ठणकर, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य शंकर भगत, युवा आगरी सेनेचे अध्यक्ष अभिजित अंदाडे यांचा समावेश होता. या वेळी शिष्टमंडळाची उद्धव ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. या वेळी शिवसेनेच्या पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी, पालघर लोकसभा संपर्कप्रमुख मिलिंद वैद्य उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List