‘एनडीटीव्ही मराठी’चा आज शुभारंभ
‘एनडीटीव्ही’ वृत्तसमूहाची नवी वृत्तवाहिनी ‘एनडीटीव्ही मराठी’चा उद्या बुधवार, 1 मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे. वांद्रे येथील ताज लँडस एंडमध्ये सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राजकीय क्षेत्रातील मंडळींच्या मुलाखतींबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेल्या मंडळींच्या मुलाखतींचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात दिग्दर्शक मधुर भांडारकर, अभिनेत्री श्रिया पिळगावकर, अभिनेता शरद केळकर, अभिनेत्री अमृता खानविलकर, अंकिता लोखंडे यांचा समावेश आहे. या नव्या वाहिनीमुळे ‘एनडीटीव्ही’च्या वाहिन्यांची संख्या सहावर पोहोचणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List