दिनेश कुमार त्रिपाठी नवे नौदलप्रमुख
ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी आज, मंगळवारी 26 वे नौदलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. आर. हरी कुमार हे नौदलप्रमुख पदावरून आज निवृत्त झाले. त्यांच्या जागी दिनेश कुमार त्रिपाठी यांनी पदभार स्वीकारला. दिनेश कुमार त्रिपाठी हे याआधी वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ राहिले आहेत. आपल्या 39 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी हिंदुस्थानी नौदलात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱया पार पाडल्या आहेत. त्यांनी आयएनएस किर्च, त्रिशूल आणि विनाश या नौदलाच्या जहाजांचेही नेतृत्व केले आहे. यासोबतच ऑपरेशनल आणि स्टाफच्या नियुक्त्याही केल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List