‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ मध्ये दिसणार ‘हे’ कलाकार; बाबुजींची भूमिका…

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ मध्ये दिसणार ‘हे’ कलाकार; बाबुजींची भूमिका…

गायक, गीतकार, संगीतकार, स्वातंत्र्यसैनिक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 1 मे महाराष्ट्र दिनी म्हणजेच उद्या हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील कलाकारांविषयी जाणून घेऊयात. सुधीर फडके म्हणजेच बाबुजींची भूमिका अभिनेते सुनील बर्वे साकारत आहे. तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच ललिताबाईंची भूमिका अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने साकारली आहे. तर विख्यात मराठी कवी आणि गीतकार ग. दि. माडगूळकर यांची भूमिका सागर तळाशीकर करत आहेत. या प्रमुख भूमिकांसोबतच इतरही महत्वपूर्ण भूमिका कोण साकारणार याची माहिती समोर आली आहे.

नामवंतांच्या भूमिका कोण साकारणार?

आदिश वैद्य (तरूण सुधीर फडके), अपूर्वा मोडक (आशा भोसले), सुखदा खांडकेकर (माणिक वर्मा), मिलिंद फाटक ( राजा परांजपे), धीरज जोशी (स्वातंत्र्यवीर सावरकर), विहान शेडगे (छोटा राम), विभावरी देशपांडे (सरस्वतीबाई, सुधीर फडकेंची आई), नितीन दंडुके (पाध्ये बुवा), परितोष प्रधान (डॅा. अशोक रानडे), साहेबमामा फतेहलाल (अविनाश नारकर), डॅा हेडगेवार (शरद पोंक्षे), न. ना. देशपांडे ( उदय सबनीस), मोहम्मद रफी (निखिल राऊत), निखिल राजे शिर्के ( श्रीधर फडके) हे कलाकार या व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या नामवंत कलाकारांना या व्यक्तिरेखांमध्ये पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

कलाकारांच्या निवडीबद्दल दिग्दर्शक म्हणाले…

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या सिनेमासाठी कलाकारांनी निवड कशी केली? याबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी आपलं मत मांडलं. कलाकारांची निवड करताना प्रत्येक कलाकार हा त्या व्यक्तिरेखेसारखा तंतोतंत दिसला पाहिजे, असा माझा अट्टाहास नव्हता. परंतु त्या व्यक्तिरेखेचे गुण त्या कलाकारातून दिसावेत, असं मला वाटत होतं. मुळात मी जाहिरात क्षेत्रातील असल्याने मी प्रत्येक कलाकाराचं स्केच बनवलं. त्यातूनच मग मला माझ्या व्यक्तिरेखा सापडत गेल्या. हे सगळेच कलाकार मातब्बर आहेत आणि त्यांनी या भूमिका चपखल साकारल्या आहेत. प्रेक्षकांना चित्रपट पाहाताना हा अनुभव निश्चितच येईल, असं योगेश देशपांडे म्हणाले.

सौरभ गाडगीळ प्रस्तुत, रिडिफाईन प्रॅाडक्शन्स निर्मित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे हे या सिनेमाचे निर्माते आहेत. तर या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांनी केलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;