मतदानासाठी मंगळवारी भर पगारी रजा, जिल्हा निवडणूक अधिकारी एम.देवेंदर सिंह यांचे आदेश

मतदानासाठी मंगळवारी भर पगारी रजा, जिल्हा निवडणूक अधिकारी एम.देवेंदर सिंह यांचे आदेश

मंगळवार दि. 7 मे रोजी प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.

या आदेशात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्हा हा 32 रायगड व 46 रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात विभागला गेला आहे व दोन्ही मतदार संघात तिस-या टप्प्यात मंगळवार दि.7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघांच्या मतदारयादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व आस्थापनाप्रमुखांना त्यांच्या अधिपत्या खालील सर्व अधिकारी,कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी यांना मंगळवार दि.7 मे रोजी भरपगारी रजा मंजूर करण्याचे आदेश पुढील शर्ती, अटीस अधिन राहून देय आहे. हा आदेश शासकीय आस्थापना, खासगी आस्थापना, रोजंदारीवरील कर्मचारी आस्थापना, दुकाने, कंपनी अशा सर्व आस्थापनांना लागू आहे. ज्या आस्थापनांमध्ये या कामगारांच्या अनुपस्थितीमुळे उक्त आस्थापनांचा धोका निर्माण होऊ शकतो अथवा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो अशा कर्मचा-यांसाठी लागू नाही. या आदेशाचे पालन न करणारे आस्थापनाप्रमुख हे उक्त कलमाचे 135 ब(2) नुसार कारवाईस पात्र राहतील. हा आदेश अन्य जिल्ह्यात काम करणा-या परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांच्या आस्थापना प्रमुखांनाही लागू होत आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;