Photo – ईशान्य मुंबईत भगवे वादळ, संजय दिना पाटील यांनी भरला उमेवारी अर्ज
विशिष्ट पद्धतीने सजवलेला ट्रक, वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा आणि नऊवारी साडीत धरलेला लेझीमचा ठेका अशा उत्साही आणि भगवेमय वातावरणात आज महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी उमेवारी अर्ज भरल्यानंतर प्रचार रॅली काढण्यात आली.यावेळी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते , शिवसैनिक मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.

About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List