मुलगा ‘अकाय’सोबत भारतात परतल्यानंतर अनुष्का शर्माने केली ‘ही’ पहिली पोस्ट शेअर, अभिनेत्री दिसली एकदम..

मुलगा ‘अकाय’सोबत भारतात परतल्यानंतर अनुष्का शर्माने केली ‘ही’ पहिली पोस्ट शेअर, अभिनेत्री दिसली एकदम..

बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असतानाही अनुष्का शर्मा ही कायमच चर्चेत असते. अनुष्का शर्मा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अनुष्का शर्मा ही काही दिवसांपूर्वीच भारतात परतलीये. मुलगा अकाय याला लंडनमध्ये जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच अनुष्का शर्मा 16 एप्रिलला भारतात दाखल झाली. अकायच्या जन्मानंतर अनुष्का शर्मा ही सोशल मीडियापासून दूर होती. आता नुकताच अनुष्का शर्मा हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. जी आता तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

अनुष्का शर्मा हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये एकदम फिट अनुष्का शर्मा दिसत आहे. अनुष्का शर्मा हिने शेअर केलेला व्हिडीओ प्रमोशनचा आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा ही व्हॅनिटी व्हॅनमधून उतरताना दिसत आहे. त्यानंतर तिला एक छोटा कुत्रा दिसतो. हा कुत्रा तिच्या मागे मागे येताना देखील दिसत आहे.

त्यानंतर अनुष्का शर्मा ही त्या कुत्राचे अनेक फोटो काढताना दिसत आहे. हेच नाही तर कुत्र्याला घेऊन देखील फोटो काढताना अनुष्का शर्मा दिसत आहे. आता मुलाच्या जन्मानंतर अनुष्का शर्मा हिने परत आपल्या कामाला सुरूवात केल्याचे व्हिडीओनंतर दिसतंय. अनुष्का शर्मा हिच्या पुनरागमनाची वाट चाहते आतुरतेने बघताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

2018 मध्ये रिलीज झालेल्या झिरो चित्रपटात अनुष्का शर्मा दिसली होती. त्यानंतर अनुष्का शर्मा ही चित्रपटात दिसली नाही. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या पहिल्या मुलीचे नाव वामिका आहे तर मुलाचे नाव अकाय ठेवले. मुलगा अकाय याची झलक चाहत्यांना अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून दाखवण्यात नाही आली.

मध्यंतरी चर्चा होती की, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे विदेशातच शिफ्ट होणार आहेत. मात्र, 16 एप्रिलला अनुष्का शर्मा भारतात परतली आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या लेकीची झलक चाहत्यांना दाखवली नव्हती. मात्र, एका मॅचदरम्यान वामिकाचा चेहरा बघायला मिळाला. अनुष्का शर्माची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;