श्रद्धा कपूर हिच्यासाठी बॉयफ्रेंडने घेतला मोठा निर्णय? अभिनेत्रीला होणार फायदा

श्रद्धा कपूर हिच्यासाठी बॉयफ्रेंडने घेतला मोठा निर्णय? अभिनेत्रीला होणार फायदा

अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) गेल्या काही दिवसांपासून फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चत आली आहे. अभिनेत्रीच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची एन्ट्री झाली आहे.. अशी चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. श्रद्धा कपूर हिच्या बॉयफ्रेंडचं नाव राहुल मोदी (Rahul Mody) असं आहे. आता राहुल याने अभिनेत्रीसाठी मोठा निर्णय घेतला असल्याची चर्चा देखील रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राहुल – श्रद्धा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान राहुल – श्रद्धा यांच्यात प्रेम बहरलं असं सांगण्यात येत आहे. अनंत अंबानी याच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी देखील राहुल – श्रद्धा यांनी केलेली एकत्र एन्ट्री तुफान चर्चेत आली. आता राहुल गर्लफ्रेंड श्रद्धा हिच्यासाठी सिनेमा निर्मित करणार असल्याची चर्चा रंगत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

एवढंच नाही तर, सर्व गोष्टी योग्य मार्गावर असतील तर श्रद्धा निर्माती म्हणून सिनेमाच्या माध्यमातून प्रॉडक्श विश्वाक पाऊल ठेवेल. सिनेमासाठी चर्चा सध्या सुरु असल्याची माहिती मिळत आहे. पण रंगणाऱ्या चर्चांवर कोणी अधिकृत घोषणा केलेली नाही.

श्रद्धा कपूर हिने दिली प्रेमाची कबुली…

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने खास फोटो पोस्ट करत मोठा खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये श्रद्धा कपूर हिच्या गळ्यात ‘R’ अक्षराचा एक पेंडेंट दिसला होता. पण अभिनेत्री अधिकृत घोषणा केलेली नाही. श्रद्धा त्या पेंडेंटने चाहत्यांचं लक्ष वेधलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

 

‘आशिकी 2’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर अभिनेत्री कधीही मागे वळून पाहिलं नाही. श्रद्धा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. श्रद्धाच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;