छत्तीसगढमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 7 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगढमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 7 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमध्ये मंगळवारी सकाळपासून मोठी चकमक सुरू आहे.  बस्तरमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमदमध्ये अनेक ठिकाणी जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. अबुझमदच्या जंगलात जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि एसटीएफची पथके  आहेत. या चकमकीत आतापर्यंत 7 नक्षलवाद्यांना कंठस्थान पोहोचवण्यात जवानांना यश आले आहे.

या कारवाईवर आयजी पी सुंदरराज यांच्यापासून एसपी प्रभात कुमार या सर्वांचे लक्ष आहे. या नक्षलवाद्यांना जवानांनी अनेक ठिकाणी घेरले असून त्यांच्यात चकमक सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नारायणपुर जिल्ह्यात जवान नक्षलग्रस्त असलेल्या ठिकाणी आहेत. नारायणुरच्या एसपी प्रभात कुमार यांनी चकमकीत नेमके किती नक्षलवाद्यांचे किती नुकसान झाले हे सांगता येत नसले तरी सुत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. चकमक सुरु असून काही दिवसांपूर्वी कांकेरमध्ये 29 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

पीटीआयच्या वृत्तानुसार, छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातील दंतेवाडा जिल्ह्यात सोमवारी सात महिला नक्षलवाद्यांसह 23 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आत्मसमर्पण करणारे नक्षलवादी भैरमगढ येथील एका कमिटीवर सक्रिय होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;