फरार प्रज्ज्वल रेवन्ना पक्षातून निलंबित, सेक्स स्कँडलप्रकरणी JDS ची कारवाई

फरार प्रज्ज्वल रेवन्ना पक्षातून निलंबित, सेक्स स्कँडलप्रकरणी JDS ची कारवाई

ऐन लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवन्ना यांचे सेक्स स्कँडल उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रज्ज्वल रेवन्ना यांचे शेकडो अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता या प्रकरणी धर्मनिरपेक्ष जनता दलाने (जेडीएस) प्रज्ज्वल रेवन्ना यांच्यावर कारवाई केली आहे. या प्रकरणावरून भाजप आणि जेडीएस यांच्या युतीवर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला आहे.

माजी पंतप्रधान देवेगौडांच्या नातवाचे सेक्स स्कँडल, शेकडो व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ; भाजपचे टेन्शन वाढले

सेक्स स्कँडल प्रकरणात प्रज्ज्वल रेवन्ना यांचे उघड झालेले 2500 व्हिडिओ आणि पेन ड्राइव्हचा तपास कर्नाटक सरकारच्या एसआयटीकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी हासनमध्ये दोन गुन्हे दाखल झाले आहेत. एक एचडी रेवन्ना आणि दुसरा गुन्हा त्यांचे पुत्र प्रज्ज्वल रेवन्ना यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. ही दोन्ही प्रकरणं कर्नाटक सरकारच्या आदेशावरून एसआयटीकडे सोपवण्यात आली आहेत. तपासाची चक्र फिरण्यापूर्वीच 33 वर्षीय प्रज्ज्वल रेवन्ना हे गेल्या आठवड्यात शनिवारी सकाळी जर्मनाला पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओशी छेडछाड करून आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी ते व्हिडिओ पसरवले जात आहेत, असा दावा रेवन्ना यांनी केला आहे.

माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल; ‘हाच भाजपचा खरा चेहरा अन् चारित्र्य’ म्हणत काँग्रेसचा हल्लाबोल

पक्षातून निलंबित

कर्नाटकातील हासन मतदारसंघाचे खासदार असलेले प्रज्ज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाल्यानंतर जेडीएसने प्रज्ज्वल रेवन्ना यांना पक्षातून निलंबित केलं आहे. जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी याची माहिती दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;