कार पाठवतोय, त्याने हॉटेलमध्ये बोलावलं आणि…., प्रसंगानंतर 7 दिवस घराबाहेर नाही आली कपिल शर्माची ‘बुआ’

कार पाठवतोय, त्याने हॉटेलमध्ये बोलावलं आणि…., प्रसंगानंतर 7 दिवस घराबाहेर नाही आली कपिल शर्माची ‘बुआ’

अभिनेत्री उपासना सिंह गेल्या 4 दशकांपासून झगमगत्या विश्वात सक्रिय आहे. अभिनेत्री तिच्या विनोदबुद्धीने कायम चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. अभिनेत्रीने विनोदवीर कपिल शर्मा याच्या शोमध्ये ‘कपिल की बुआ’ म्हणून देखील प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली. चाहत्यांना कायम पोट धरुन हसवणाऱ्या उपासना हिच्या करियरमध्ये एक दिवस असा आला होता, जेव्हा अभिनेत्रीला अत्यंत वाईट प्रसंगाचा सामना करावा लागला होता. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री मोठा खुलासा केला आहे. एका दिग्दर्शकाने उपासना हिला हॉटेलमध्ये बोलावलं होतं. त्यानंतर घडलेली घटना अभिनेत्री सांगितली.

झगमगत्या विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण उपासणा हिच्यासाठी बिलकूल सोपं नव्हतं. अभिनेत्री म्हणाली, ‘एक वेळ अशी आली जेव्हा सिनेमांध्ये काम करायचं नाही… असा निर्णय मी घेतला होता. सिनेमांमध्ये काम करणं देखील मी सोडलं होतं. या ठिकाणी मी त्या दिग्दर्शकाचं नाव घेणार नाही त्याने मला अभिनेता अनिल कपूर याच्यासोबत कास्ट केलं होता..’

‘अनिल कपूर याच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळतेय म्हणून मी देखील आनंदी होती. मी कुटुंबातील सर्वांना सांगितलं होतं. पण एका रात्री मला दिग्दर्शकाचा फोन आला आणि त्याने मला भेटण्यासाठी बोलावलं. तेव्हा मी फक्त 17 वर्षांची होती…’

‘मला कळत नव्हतं दिग्दर्शकाला काय सांगू… मी त्याला सांगितलं उद्या सकाळी येते. माझ्याकडे हॉटेलमध्ये येण्यासाठा वाहन नाही. तेव्हा दिग्दर्शक मला म्हणाला, ‘मी कार पाठवतो, तू हॉटेलमध्ये ये..’ पुढे दिग्दर्शक म्हणाला, तुला सिटिंगचा अर्थ कळत नाही का? फिल्मी लाईनमध्ये येण्यासाठी सिटिंग करावीच लागते. अखेर मला त्याचा हेतू कळला… तेव्हा मी त्याला सुनावलं….’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन मी दिग्दर्शकाला सुनावलं. अखेर अनिल कपूर याच्यासोबत त्याने दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट केलं. मला सिनेमातून बाहेर करण्यात आलं… तेव्हा मला खूप वाईट देखील वाटलं. मी खूप रडली देखील..’

‘मी दिग्दर्शकाला म्हणाले, माझ्या वडिलांच्या वयाचा आहेस आणि माझ्याबद्दल असे विचार करतोस… त्या घटनेनंतर मी 7 दिवस घरातून बाहेर पडले नाही… मी सतत रडत होती… तेव्हा माझ्या आईने मला समजावलं… आई माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिली…’ असं म्हणत अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उपासना हिच्या संघर्षाची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;