काम केलंय म्हणतात, मग मोदींना सांगत फिरण्याची गरज काय?

काम केलंय म्हणतात, मग मोदींना सांगत फिरण्याची गरज काय?

‘गेल्या 10 वर्षांत मोदींनी खूप काम केल्याने ते महाराष्ट्रात गरागरा फिरत आहेत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष-खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची खिल्ली उडविली. ‘जर मोदींनी 10 वर्षांत खूप काम केले आहे, तर त्यांना काम सांगण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरण्याची गरजच का भासते?’ असा सवाल करीत शरद पवार यांनी फटकारले आहे.

साताऱयाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ वाई येथे आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, ‘देशाचे राजकारण उद्ध्वस्त करण्याचे काम मोदी यांनी केले. भ्रष्टाचार करणाऱयांना बरोबर घेऊन देशात दबावाचे राजकारण सुरू आहे. त्यांच्याविरोधात बोलणाऱयांना थेट तुरुंगात डांबले जातेय. त्यांची पक्ष पह्डण्याची भूमिका लोकांना पटलेली नाही. देश एकसंध ठेवायचा असेल, लोकशाही मजबूत करायची असेल, तर राजकीय पक्ष व्यवस्थित चालतील, याची काळजी घेतली पाहिजे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना समाजाचे भविष्य कळत नाही. पंतप्रधानांच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्र वेगळय़ा रस्त्याने जाणार आहे. चुकीचे राजकारण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पावले टाकली, त्यांच्या हातात जनता देश देणार नाही. लोकांच्या मनामध्ये नसलेल्या गोष्टी आणून देशाचा कारभार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोदी यांची धोरणे महागाई कमी करण्याची नाहीत, तर ती वाढवण्याची आहेत,’ असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

‘देशाची लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी,  महागाई वाढवून गोरगरीबांचे पंबरडे मोडणाऱयांना धडा शिकवण्यासाठी सत्ताबदल करावाच लागेल,’ असे आवाहन शरद पवार यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;