उज्ज्वल निकम म्हणजे निकम्मा नाग; किरण माने यांची जोरदार टीका

उज्ज्वल निकम म्हणजे निकम्मा नाग; किरण माने यांची जोरदार टीका

उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कापून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना या मतदारसंघातून भाजपने उमेदवारी जारी केली आहे. यावर किरण माने यांनी संताप व्यक्त करत उज्ज्वल निकम म्हणजे निकम्मा नाग अशी जोरदार टीका केली आहे.

उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून टीका केली. त्यांनी लिहिले, महाराष्ट्रातल्या दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा न्यूज चॅनल्स याच विद्वान वकिलाकडून एक्सपर्ट ओपिनियन घेत होते. हा भामटा पटवून देत होता की, हे दरोडे कसे कायदेशीर आहेत. आता समोर आला हा संविधानावर दरोडा घालू पाहणाऱया टोळीला सामील झालेला निकम्मा नाग.’ दरम्यान, फेसबुकप्रमाणेच इन्स्टाग्रामवरी एक पोस्ट टाकून किरण माने यांनी निकम यांच्यावर टीका केली. या पोस्टमध्ये त्यांनी निकम यांच्या पत्रकार परिषदेतील एक प्रश्न आणि त्यावर निकम यांनी दिलेले उत्तर लिहिले आहे. ‘तुम्ही वर्षा गायकवाड यांचे आव्हान कसे पेलणार’, असा प्रश्न निकम यांना पत्रकाराने विचारला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, ‘माझा जन्म हनुमान जयंतीचा आहे.’ असला हास्यास्पद, बालीशबुद्धी, निकम्मा माणूस महाराष्ट्रात विद्वान कायदेतज्ञ म्हणून आजवर मिरवत होता, अशी टीका किरण माने यांनी या पोस्टमध्ये केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;