‘गुलाबी साडी’ झळकली न्यूयॉर्कच्या टाईम स्क्वेअरवर…
मराठमोळा गायक संजू राठोडने गायलेले ‘गुलाबी साडी’ हे गाणे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे. ‘गुलाबी साडी’ गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. अनेकांनी या गाण्यावर रील्स बनवल्या आहेत. हे गाणे आता अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकले. न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर पहिल्यांदाच मराठी गाणे झळकले आहे.
याबाबत गायक संजू राठोड याने आनंद व्यक्त केला. संजू राठोड म्हणाला, अल्पावधीतच एवढे यश मिळाले, यासाठी मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. आतापर्यंत माझ्या गाण्यांनी 70 दशलक्ष ह्यूजचा टप्पा पार केला, हाच आनंद माझ्यासाठी फार मोठा होता. त्यातच आता न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर माझे गाणे झळकले. यामुळे माझ्या आनंदात आणखी भर पडली आहे. माझा आनंद शब्दांत व्यक्त करणे फार कठीण आहे. हे सगळे शक्य झाले ते माझ्या चाहत्यांमुळे आणि त्यांनी माझ्या गाण्यांना दिलेल्या प्रतिसादामुळे. त्यांच्या प्रेमामुळे मला आणखी प्रेरणा मिळाली आहे. चाहत्यांचे ऋण मी कधीही विसरणार नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List