बेस्ट बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणारे गजाआड

बेस्ट बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणारे गजाआड

बेस्टमध्ये चढताना अथवा धावत्या बसमध्ये गर्दीचा गैरफायदा उचलत प्रवाशांच्या खिशातले मोबाईल शिताफीने लंपास करणाऱया सराईत चोरटय़ांच्या घाटकोपर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्या चोरांकडून मोबाईल हस्तगत करण्यातही यश आले आहे. हेमंत यादव हे खरेदी करून घरी जाण्यासाठी घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात 303 क्रमांकाच्या बसमध्ये चढत असताना त्यांचा मोबाईल चोरण्यात आला. याबाबत त्यांनी घाटकोपर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पद्माकर पाटील व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर आरोपी शीव-कुर्ला-घाटकोपर-असल्फा-अंधेरी या मार्गावर बेस्ट बसमध्ये नियमित चोऱया करत असल्याचे समोर आले. ते आरोपी गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात राहणारे असल्याचे समजताच पोलिसांनी तेथे जाऊन रज्जाक सय्यद, अब्दुल खान या दोघांसह एका अल्पवयीन मुलाला पकडले. त्यांच्याकडून चोरीचा एक मोबाईल हस्तगत करण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;