एक साथ, एक कदम… महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी!
महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त 1 मे रोजी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पोलीस, विविध सशस्त्र दलाच्या जवानांच्या संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या मुख्य समारंभाची रंगीत तालीम सोमवारी पार पडली. या रंगीत तालमीत राज्य राखीव पोलीस बल, मुंबई पोलीस सशस्त्र बल, मुंबई दंगल नियंत्रण पथक, मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस ध्वज, मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, मुंबई अग्निशमन दल ध्वज, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, मुंबई महापालिका सुरक्षा दल, मुंबई आणि ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ, मुंबई पोलीस आणि मुंबई लोहमार्ग पोलीस ब्रास बॅण्ड पथक, राज्य राखीव पोलीस बलाचे पाइप बॅण्ड पथक, मुंबई पोलीस विभागाचे निर्भया वाहन पथक, मुंबई अग्निशमन दलाचे हाय राईज फायर फायटिंग वाहन, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर या पथकांनी सहभाग घेतला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List