पोलिसांपासून वाचण्यासाठी 40 तासांमध्ये अभिनेता फिरला तब्बल पाच राज्यात, अत्यंत हैराण करणारे खुलासे, अखेर पोलिसांनी..

पोलिसांपासून वाचण्यासाठी 40 तासांमध्ये अभिनेता फिरला तब्बल पाच राज्यात, अत्यंत हैराण करणारे खुलासे, अखेर पोलिसांनी..

बाॅलिवूड अभिनेता साहिल खान याच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ झालीये. महादेव बेटिंग ॲप प्रकरण अभिनेत्याच्या अंगलट आल्याचे बघायला मिळतंय. पोलिसांनी साहिल खान याला छत्तीसगढ येथून अटक केली. पोलिस साहिल खान याच्या मागावर होते. 1 मे पर्यंत साहिल खान याला पोलिस कोठडी सुनावली आली आहे. मात्र, पोलिसांनी आपल्याला अटक करू नये, यासाठी सतत आपले लोकेशन बदलताना साहिल खान दिसला. हेच नाही तर अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय साहिल खान हा आपला मोबाईल देखील सुरू करत नसल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात फक्त साहिल खान हाच नाही तर अजूनही बाॅलिवूड कलाकारांची नाव पुढे आली आहेत. माहितीनुसार साहिल खान हा अटकेपासून वाचण्यासाठी 40 तासांमध्ये तब्बल 5 राज्यांमध्ये फिरला. 25 एप्रिलला साहिल खान याची अटकपूर्व याचिका कोर्टाने फेटाळली, त्यानंतर साहिल खान मुंबईतून फरार झाला.

साहिल खान हा सर्वात अगोदर कर्नाटकला गेला. त्यानंतर तिथे थोडा आराम करून तेलंगना हैद्राबाद येथे पोहचला. यावेळी गाडी आणि एक चालक देखील त्याच्यासोबत होता. अभिनेता सतत फोन बंद करत असल्याने पोलिसांनी थेट त्याच्या गाडी चालकाच्या फोनचे लोकेशन ट्रेस केले. छत्तीसगढला जाण्यासाठी अभिनेता गडचिरोलीच्या घनदाट जंगलातूनही गेला.

यानंतर साहिल खान याने जगदलपूर येथे एक हाॅटेल बुक केले. यावेळी पोलिस साहिल खान याच्या मागावरच होते. याची कल्पना साहिल खान याला अजिबात नव्हती. हेच नाही तर साहिल खान याला पोलिसांनी ज्यावेळी ताब्यात घेतले, त्यावेळी त्याने आपल्या चेहऱ्याला मास्क लावले होते. आपला चेहरा लपवताना साहिल खान हा दिसत होता.

‘द लोटस बुक ॲप’ नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये साहिल खान हा पार्टनर होता. या ॲपचा तो प्रचारही करत होता. हे ॲप महादेव बेटिंग ॲपशीही जोडलेले आहे. यासोबतच अजूनही काही आरोप हे साहिल खान याच्यावर करण्यात आले. साहिल खान याच्या चित्रपटांना काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. साहिल खान हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. सोशल मीडियावर साहिल खानची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;