नरेंद्र मोदी, अमित शहा घाबरले म्हणून वारंवार….तेजस्वी यादव यांचा निशाणा
तेजस्वी यादव यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे खोटं बोलणारे पंतप्रधान आहेत. आतापर्यंत त्यांनी बिहारबाबत जी काही आश्वासने दिली ती पूर्ण केलेली नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघंही घाबरले आहेत, त्यामुळे वारंवार बिहारला येत असल्याचा जबरदस्त टोला त्यांनी लगावला आहे.
तेजस्वी यादव म्हणाले की, इंडिया अलायन्सला बिहारमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही आधीही सांगितले होते आणि आजही सांगतो की, यावेळी धक्कादायक निकाल असणार आहेत. ही निवडणुक फार महत्त्वाची असून ती संविधान लोकशाही वाचविणारी निवडणुक आहे. पुढे तेजस्वी यांनी दावा केला की, भाजप सांगतय 40 जागा जिंकणार आहोत. याचा अर्थ त्यांची जीभ घसरली. ते हे सांगू इच्छित आहेत की, बिहारच्या 40 जागांवर हरत आहेत.
तेजस्वी यादव म्हणाले की, खोटं हे ओरडून बोलतात जेणेकरून सत्याचा आवाज दबला जाईल. वातावरण महाआघाडीच्या बाजूने असून जनता आम्हाला पूर्ण पाठिंबा देत असल्याचे आम्ही म्हणत आहोत. दोन टप्प्यातील निवडणुकाही आम्ही जिंकल्या आहेत. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी 400 पारचा नारा दिला आहे, पण दोन टप्प्यातील लोकसभा निवडणुका पाहता हे शक्य नसल्याचे विरोधी पक्ष म्हणू लागले आहेत. यावेळी इंडिया अलायन्सच्या मोठ्या विजयाचा दावा केला जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List